अभ्यासक्रम →Level 10 · क्रियापद →पाठ 5

Level 10 · Lesson 5

वर्तमानकाळाचे चार प्रकार
The four presents

मी जातो, मी जात आहे, मी गेलो आहे, मी जात असतो — वर्तमानकाळाचे चार प्रकार आणि त्यांची बांधणी.

Simple, continuous, perfect and habitual — the four presents of Marathi, and how each one is built.

तुम्हाला हे येतंच · You already know this

पाठ २-११ मध्ये तुम्ही म्हणालात — मी सिनेमा बघत आहे. पाठ ४-१५ मध्ये म्हणालात — मी नेहमी सकाळी चालतो. दोन्ही वाक्ये वर्तमानकाळातली आहेत, पण त्यांचा अर्थ एक नाही. पहिले आत्ता चालू असलेली क्रिया सांगते, दुसरे रोजची सवय. मराठीत वर्तमानकाळाचे असे चार प्रकार आहेत आणि चारही तुम्ही आधीच वापरले आहेत — आज फक्त त्यांना नावे मिळणार आहेत.

You have been making all four of these since level 2 without a name for any of them. मी बघत आहे was lesson 2-11; मी नेहमी चालतो was lesson 4-15; मी जेवण केले आहे you said the first time you told somebody you had eaten. Marathi splits the present into four boxes, and English speakers walk into the same trap every time: मी जातो does not mean I am going. It means I go — as a rule, as a habit, as a fact about me. This lesson gives you the other three boxes and the piece that goes in each.

नियम · The rules

धातूला -तो, -ते, -तात असे प्रत्यय लागून साधा वर्तमानकाळ होतो; तो सवय, नियम किंवा नेहमीची गोष्ट सांगतो.
नियम १
जा + तो = जातो; जा + ते = जाते; जा + तात = जातात. मी रोज शाळेत जातो. सूर्य पूर्वेला उगवतो.
The plain present. In spite of its name it rarely means right now — it means as a rule.

साध्या वर्तमानकाळाचे रूप कर्त्याच्या पुरुष, लिंग आणि वचनाप्रमाणे बदलते — मी जातो, मी जाते, तू जातोस, तू जातेस, तो जातो, ती जाते, आम्ही जातो, तुम्ही जाता, ते जातात.

It agrees with the कर्ता in person, gender and number — the machinery of lesson 10-3. A man says मी जातो and a woman मी जाते for exactly the same errand; the verb, not the pronoun, carries the speaker's gender.

धातूच्या -त रूपापुढे आहे या क्रियापदाचे रूप आले की अपूर्ण वर्तमानकाळ होतो; क्रिया आत्ता चालू आहे असे तो दाखवतो.
नियम २
जात + आहे = जात आहे. मी आत्ता जेवत आहे. याला काही व्याकरणे चालू वर्तमानकाळ असेही म्हणतात.
The continuous present: the -त form plus आहे. Some school books call it चालू वर्तमानकाळ; both names name the same box.

इथे -त रूप गोठलेले असते — ते लिंगाप्रमाणे बदलत नाही. बदलते ते आहे — मी जात आहे, तू जात आहेस, ती जात आहे, आम्ही जात आहोत, तुम्ही जात आहात, ते जात आहेत. नकार देताना मात्र पहिले दोन प्रकार एकच होतात — मी जात नाही.

Notice where the work is done: जात never changes, and आहे carries the whole load of person and number. And a warning worth having early — in the negative the first two boxes collapse into one. मी जात नाही does duty both for I do not go and for I am not going; only the context tells them apart.

भूतकाळाच्या -ल- रूपापुढे आहे आले की पूर्ण वर्तमानकाळ होतो; क्रिया पूर्ण झाली, पण तिचा संबंध आत्ताशी आहे.
नियम ३
गेलो + आहे = गेलो आहे. तो आत्ताच घरी आला आहे. मी जेवण केले आहे.
The perfect: the -ल- past form plus आहे. Done, but still relevant now.

तो आला आणि तो आला आहे यांत फरक आहे. पहिले नुसती बातमी देते; दुसरे सांगते की तो आत्ता इथे आहे. आणि सकर्मक क्रियापद असेल तर पाठ ४-३ व ४-४ चा नियम इथेही चालतो — कर्त्याला -ने आणि क्रियापद कर्माप्रमाणे — त्याने पुस्तक वाचले आहे, तिने पोळी केली आहे, मुलांनी आंबे खाल्ले आहेत.

तो आला is a bare report; तो आला आहे tells you he is here now. And because this box is built on the -ल- form, everything lessons 4-3 and 4-4 taught still applies: the doer takes -ने and the verb agrees with the object. त्याने पुस्तक वाचले आहे — वाचले for नपुंसकलिंगी पुस्तक, not for तो.

धातूच्या -त रूपापुढे असणे या क्रियापदाचे वर्तमानरूप — असतो, असते, असतात — आले की रीति वर्तमानकाळ होतो; ठरलेली रीत तो सांगतो.
नियम ४
जात + असतो = जात असतो. तो रोज सकाळी फिरायला जात असतो. ती दुपारी वाचत असते.
The habitual present: the -त form plus असतो. That is simply what he does.

साधा वर्तमानकाळ आणि रीति वर्तमानकाळ जवळचे आहेत, पण रीतिरूप सवयीवर जोर देते. तो पेपर वाचतो हे नुसते सांगणे; तो रोज सकाळी पेपर वाचत असतो हे त्याची ठरलेली रीत सांगणे.

These last two boxes overlap, and Marathi lets you choose. तो पेपर वाचतो simply states it. तो रोज सकाळी पेपर वाचत असतो insists on the routine — it is what he is always found doing. Reach for the रीति form when the habit itself is your point.

पायरी पायरीने · Step by step

मी जात आहे — अपूर्ण वर्तमानकाळ
  1. जाणे— क्रियापदाचे मूळ रूप
  2. जा— -णे काढले की धातू उरतो — पाठ १०-१
  3. जा + त → जात— धातूला -त लागते; हे रूप लिंग-वचनाने बदलत नाही
  4. जात + आहे → मी जात आहे— आहे प्रथमपुरुष एकवचनी — अपूर्ण वर्तमानकाळ
त्याने पुस्तक वाचले आहे — पूर्ण वर्तमानकाळ
  1. वाचणे → वाच— -णे काढून धातू
  2. वाच + ले → वाचले— -ल- रूप; कर्म पुस्तक नपुंसकलिंगी एकवचन, म्हणून -ले
  3. तो → त्याने— सकर्मक क्रियापदाच्या -ल- रूपाबरोबर कर्त्याच्या सामान्यरूपाला -ने — पाठ ४-४
  4. वाचले + आहे → त्याने पुस्तक वाचले आहे— -ल- रूपापुढे आहे — पूर्ण वर्तमानकाळ

या दोन पायऱ्यांमधला फरक लक्षात ठेवा — पहिल्यात -त रूप, दुसऱ्यात -ल- रूप. -ने कुठे लागते हे काळ ठरवत नाही, -ल- रूप ठरवते. म्हणून मी जात आहे मध्ये -ने नाही, पण त्याने वाचले आहे मध्ये आहे.

Hold on to the difference between those two derivations, because the next two lessons turn on it. The -ने is not attached to a tense; it is attached to the -ल- form. मी जात आहे is built on -त, so no -ने anywhere. त्याने वाचले आहे is built on -ल-, so the -ने appears — even though we are standing squarely in the present.

सराव · Practice

मी आत्ता जेवत आहे — हा कोणता प्रकार?Which present is this?
तो रोज सकाळी फिरत असतो — हे रूप काय सांगते?What does this form say?
ती नुकतीच घरी ________ आहे. (येणे — पूर्ण वर्तमानकाळ)She has just come home.
त्याने पत्र ________ आहे. (लिहिणे — पूर्ण वर्तमानकाळ)He has written the letter.
वाक्य लावा — रीति वर्तमानकाळ.Build the habitual present sentence.
रूप आणि त्याचे नाव जुळवा.Match each form to its name.